राष्ट्रीय जनता दलाने शवपेटीशी केली नवीन संसद भवनाची तुलना !

नवी देहली – राष्ट्रीय जनता दलाने नवीन संसद भवनाची तुलना शवपेटीशी करणारे ट्वीट केले आहे. राजदने ट्वीट करतांना शवपेटी आणि नवीन संसद भवन यांचे छायाचित्र पोस्ट करत ‘हे काय आहे ?’ असा प्रश्‍न विचारला आहे.

या ट्वीटवर भाजपचे नेते सुशील मोदी म्हणाले की, आज सर्व पक्षांच्या लोकांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला असला, तरी उद्या सभागृहाचे कामकाज तिथेच प्रारंभ होणार आहे. राष्ट्रीय जनता दलाने नवीन संसद भवनावर कायमचा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे का ? ते लोकसभेच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र देणार का ? शवपेटीचे छायाचित्र दाखवण्यापेक्षा अपमानास्पद काहीही नाही.

संपादकीय भूमिका 

विरोधाला विरोध करण्यासाठी नकारात्मकतेचे टोक गाठणारा राजद पक्ष ! अशांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच !