पुणे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे शहर वाहतूक पोलीस अन् आर्.टी.ओ. (प्रादेशिक परिवहन कार्यालय) प्रशासनाला शहरातील सरकारी कार्यालयात शिरस्त्राण परिधान न करणार्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. ‘शहरातील वाढते अपघात रोखणे आणि मोटार वाहन कायद्यातील नियमांचे पालन होणे’, हे याचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यामुळे पुणे आर्.टी.ओ.ने २४ मे या एका दिवसात ७३ जणांच्या पथकाने पुणे शहरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन ६२२ शिरस्त्राण परिधान न करणारे कर्मचारी आणि वाहनचालक यांवर कारवाई केली, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
संपादकीय भूमिका‘नियम हे पाळण्यासाठी असतात’, याचाच विसर पडलेले सरकारी कर्मचारी |