Bangladeshi Americans Urge Trump : बांगलादेशातील अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यास साहाय्य करा !

अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांनी डॉनल्ड ट्रम्प यांना केली विनंती !

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन (अमेरिका) – बांगलादेशी अमेरिकी, हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती यांच्या गटाने अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांना निवेदन पाठवले आहे. यामध्ये ट्रम्प यांना बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदायांच्या संरक्षणासाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे. देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले चिन्मय प्रभु यांची सुटका करण्याची मागणीही या गटाने ट्रम्प यांना केली आहे.

या निवेदनात बांगलादेशातील अल्पसंख्यांक समुदायांचे रक्षण करण्यासाठी तेथे सर्वसमावेशक ‘अल्पसंख्याक संरक्षण कायदा’ करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. तसेच सुरक्षाक्षेत्रांची स्थापना, अल्पसंख्यांकांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद आणि धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्यासाठी द्वेषपूर्ण गुन्हे आणि द्वेषयुक्त भाषणांविरुद्ध कठोर कायदे करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

उद्या ट्रम्प यांनी बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण केले, तर भारतीय हिंदूंना एकीकडे आनंद होईल, तर दुसरीकडे स्वतःचे धर्मबांधवांचे रक्षण करू न शकल्याने लाजही वाटेल !