मला स्वच्छेने सनातन धर्म स्वीकारायचा आहे ! – बांगलादेशातून आलेली मुसलमान तरुणी

परसवाडा भागात बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या रामकथा वाचनाच्या वेळी बांगलादेशी मुसलमान तरुणीने तिचे विचार मांडले. शास्त्री यांनी तिला व्यासपिठावर बोलावले होते. ती म्हणाला की, भगवान राम यांचे नाव घेतल्याने मनःशांती मिळते.

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी सज्ज व्हा ! – धीरेंद्र कृष्णशास्त्री

बागेश्‍वर धामचे स्वामी धीरेंद्र कृष्णशास्त्री १० दिवसीय  गुजरात दौर्‍यावर आले आहेत. ते कर्णावती येथे पोचले. कर्णावतीमधील वटवा येथे देवकीनंदन महाराजांच्या शिवपुराण कथेत त्यांनी भाग घेतला.

देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे अपरिहार्य ! – योगऋषी रामदेवबाबा

लोकसंख्या नियंत्रण कायदा केला, तर तो हिंदूच पाळतील आणि ‘आम्ही ५ आणि आमचे २५’ म्हणणारे त्याचे उल्लंघनच करत रहातील, हेही तितकेच खरे आहे ! त्यामुळे याचा विचारही आता करण्याची आवश्यकता आहे की, हा कायदा कुणासाठी केला पाहिजे !

‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा नोंद !

बंगालमध्ये लोकशाही नाही, तर हुकूमशाही आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरही तृणमूल काँग्रेस सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत दाखवण्यात आला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील वादग्रस्त माहितीपट !

ऑस्ट्रेलियन नागरिकांचा हिंदुद्वेष !
बीबीसीने हा चित्रपट बनवला आहे. भारत सरकारने देशात या माहितीपटावर बंदी घातली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांच्या बिकट परिस्थितीवरून उद्धव ठाकरे गटाची आंदोलनाची चेतावणी

सातत्याने उद्भवणार्‍या या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत नाही ! त्यामुळे प्रत्येक समस्येसाठी नागरिकांना आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !

बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९७.५१ टक्के

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ सहस्र ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ सहस्र ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे.

गोवा राज्यातील महत्त्वाच्या धरणांतील पाण्याची पातळी घटल्याने पाणीटंचाईचे सावट !

राज्यातील महत्त्वाच्या ६ पैकी ३ धरणांची पाण्याची पातळी पुष्कळ खालावल्याने आणि पावसाचे आगमन उशिरा होण्याची चिन्हे असल्याने पाण्याच्या दुर्भिक्षाचे सावट राज्यावर पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

गोव्यात जून मासात ‘जी-२०’च्या ३ बैठका होणार !

५ ते ७ जून या कालावधीत तिसरी ‘इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रूप’ची, १९ ते २० जून या कालावधीत चौथी पर्यटन कृती गटाची बैठक आणि २१ अन् २२ जून या दिवशी पर्यटनमंत्र्यांची बैठक होणार आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांनी ट्वीट करून दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील सैनिक सैन्यातून १३ वर्षांपासून बेपत्ता !

सैन्यातून वर्ष २०१० पासून बेपत्ता झालेले सैनिक रवींद्र भागवत पाटील यांचा शोध घेऊन त्याला सोपवावे, अशी मागणी हरवलेल्या सैनिकाचे माता-पिता यांनी केली आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालू केले आहे.