संप्रदायांच्या प्रमुखांनो, हे लक्षात घ्या !

‘सांप्रदायिक साधनेतील बहुतेक भक्तांची प्रगती न झाल्यामुळे त्यांचा साधनेवरचा विश्‍वास डळमळीत होतो. असे होऊ नये म्हणून ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा सिद्धांत लक्षात घेऊन संप्रदायांच्या प्रमुखांनी तसे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी विविध साधनामार्गांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

मूळ दस्तावेज जमा करणे आणि रोखून ठेवणे याचा शाळा अन् विद्यालये यांना अधिकारच नाही !

कॉन्व्हेंट, शाळा, विद्यालय आणि महाविद्यालये येथे प्रवेश घेतांना विद्यार्थ्यांचे मूळ दस्तावेज जमा करण्याची सक्ती करणे आणि नंतर शाळा, विद्यालय सोडतांना शुल्क किंवा अन्य कारणासाठी मूळ दस्तावेज रोखून ठेवता येणार नाहीत.

…ही तर चाचपणी; भविष्यातील धोका ओळखून हिंदूंनी सावध रहावे ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज

एकीकडे मूर्तीपूजा मानायची नाही, तर दुसरीकडे मात्र मंदिरांच्या नावाने स्वत: व्यवसाय करायचा, हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे हिंदूंनी अशा लोकांकडून पूजा-प्रसादाचे साहित्य का विकत घ्यावे ? त्यांच्याकडून पूजासाहित्य घेण्यावर बहिष्कार का घालू नये ?

जालना येथे धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षकास लाच घेतल्याप्रकरणी अटक !

२३ मे या दिवशी यातील १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जंघाळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.

लष्कराची लेखी परीक्षा देणार्‍या तोतया उमेदवारांना अटक !

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम ! अशा प्रकारे उत्तीर्ण होण्याचा मार्ग अवलंबणार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) येथील अपघातात ५ जण आणि १९० मेंढ्या ठार

ट्रकचालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभ्या असलेल्या ट्रकवर त्याचे वाहन आदळले.

पशूवधगृह बंद करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीचे निवेदन घेऊन आलेले वृद्ध उपमुख्यमंत्र्यांसमोर कोसळले !

आता तरी त्याची नोंद घेऊन पशूवधगृह बंद करतील का ? राज्यभर सगळीकडे अवैध पशूवधगृहे मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांवरच सरकारने काहीतरी कार्यवाही करायला हवी !

 ‘लव्ह जिहाद’चे वास्तव हिंदु जनजागृती समिती कित्येक वर्षे मांडत आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

आपण सर्वांनी जागृत होऊन धर्मशिक्षण घेतले, तरच अशा घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते सावर्डे येथील विठ्ठल मंदिरात २२ मे या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने २८ मे या दिवशी रक्तदान शिबिर !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ वेल्फेअर असोसिएशन’च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

वित्त आयोगाचा १०० टक्के निधी व्यय व्हावा ! – मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा

केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगातील ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा आहे.