ऑस्ट्रेलियाच्या संसदेत दाखवण्यात आला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील वादग्रस्त माहितीपट !

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलियाचा दौरा संपल्यानंतर स्थानिक संघटनांकडून गुजरात दंगलीवरून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात बनवलेला माहितीपट ‘इंडिया : द मोदी क्वेश्‍चन’ हा संसदेत दाखवण्यात आला.

बीबीसीने हा चित्रपट बनवला आहे. चित्रपट दाखवला गेल्याच्या वेळी काही निवडक लोकच उपस्थित होते. पंतप्रधान अल्बानीज यांनी भारतातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या आरोपांविषयी आणि माध्यमांचे स्वातंत्र्य अल्प करण्याविषयी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी संसदेत करण्यात आली. भारत सरकारने देशात या माहितीपटावर बंदी घातली आहे.

 (सौजन्य : Bharat Tak)

संपादकीय भूमिका

ऑस्ट्रेलियन नागरिकांचा हिंदुद्वेष !