देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा करणे अपरिहार्य ! – योगऋषी रामदेवबाबा

डेहराडून (उत्तराखंड) – देशातील लोकसंख्येची स्थिती पुष्कळ गंभीर झाली आहे. देशातील लोकसंख्या १४० कोटी झाली आहे. आता अधिक भार सहन करता येणार नाही. यासाठी आता संसदेने लोकसंख्या नियंत्रण कायदा बनवणे अपरिहार्य झाले आहे, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी केले आहे. ‘आजच्या काळामध्ये रेल्वे, विमानतळ, महाविद्यालये, रोजगार आदी लोकांना देऊ शकलो, तर मोठी गोष्ट आहे. अजून भार देशावर टाकता येऊ नये’, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका 

लोकसंख्या नियंत्रण कायदा केला, तर तो हिंदूच पाळतील आणि ‘आम्ही ५ आणि आमचे २५’ म्हणणारे त्याचे उल्लंघनच करत रहातील, हेही तितकेच खरे आहे ! त्यामुळे याचा विचारही आता करण्याची आवश्यकता आहे की, हा कायदा कुणासाठी केला पाहिजे !