दाऊदच्या हस्तकांद्वारे मुंबई आणि ठाणे येथे बनावट नोटांची छपाई, ६ ठिकाणी धाडी !

कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम (डावीकडे)

मुंबई – कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या हस्तकांद्वारे मुंबई आणि ठाणे येथे बनावट नोटांची छपाई होत असल्याचा प्रकार राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने उघडकीस आणला आहे. बनावट नोटांच्या प्रकरणी मुंबई आणि ठाणे येथील ६ ठिकाणांवर १० मे या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने धाडी घातल्या. यामध्ये बनावट नोटा सिद्ध करणारी यंत्रे आणि शस्त्रसाठा कह्यात घेण्यात आला आहे. भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी पाकिस्तानमधून बनावट नोटांची छपाई चालू असल्याचे अन्वेषण यंत्रणेकडून सांगण्यात आले.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ११ मे या दिवशी प्रसिद्धीपत्रक काढून याविषयी माहिती दिली. यानुसार भारतात बनावट नोटा घुसवण्यासाठी दाऊदची टोळी अर्थात् ‘डी कंपनी’ प्रयत्नरत आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून घालण्यात आलेल्या सर्व धाडी ‘डी कंपनी’शी संबंधितांशी होत्या. दाऊद याचा भाऊ इक्बाल हा भारतात हे काम करत आहे. सध्या इक्बाल कारागृहात आहे. त्याच्यासह त्याचे साथीदार मुमताज शेख आणि इसरार अली यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या हे दोघेही कारागृहात आहेत.

संपादकीय भूमिका

  • भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करणार्‍या संबंधित आरोपींना कठोर शिक्षाच करायला हवी ! या यंत्रणेचे संपूर्ण जाळेच उद्ध्वस्त करायला हवे !