(म्हणे) ‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाचे डोळे काढणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !’ – ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या धर्मांध संघटनेची घोषणा

बिहारमधील ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ नावाच्या धर्मांध संघटनेची कायदाद्रोही घोषणा !

‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’या संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करताना (डावीकडे) आणि दिग्दर्शक सुदिप्तो सेन

मुझफ्फरपूर (बिहार) – येथील ‘हक-ए-हिंदुस्तान मोर्चा’ या संघटनेने ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुदिप्तो सेन यांचे डोळे काढणार्‍याला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, अशी घोषणा केली आहे. या संघटनेचे अध्यक्ष तमन्ना हाशमी यांनी ही घोषणा केली आहे. येथे या संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी या चित्रपटाची भित्तीपत्रके जाळण्यात आली.

हाशमी म्हणाले की, या चित्रपटाच्या माध्यमातून मुसलमानांना अपकीर्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा चिथावणी देणारा चित्रपट असून यावर बिहारमध्ये बंदी घातली पाहिजे.

संपादकीय भूमिका

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल (संयुक्त) यांचे हिंदुद्वेषी सरकार असल्याने अशा संघटनेवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्‍चित !