हिंडेनबर्गने मॉरिशसमधील अदानी उद्योग समूहावर केलेले आरोप निराधार ! – मॉरिशस

गौतम अदानी

नवी देहली – अमेरिकेतील ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या आस्थापनेच्या अहवालात भारतातील गौतम अदानी उद्योगसमूहाने घोटाळा केल्याचा दावा करण्यात आला होता. यानंतर या उद्योगसमूहाची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली होती. या प्रकरणी आता या समूहाला दिलासा मिळाला आहे. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने मॉरिशसमध्ये अदाणी समूहावर केलेले आरोप ‘खोटे आणि निराधार’ आहेत’, असे मॉरिशसचे आर्थिक सेवा मंत्री महेनकुमार सेरुत्तून् यांनी त्यांच्या संसदेत सांगितले. मॉरिशस कर नियमांचे पालन करत आहे. आतापर्यंत देशात कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आलेले नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.