म्हादई प्राधिकरण गोव्याचे हित पहाण्याची शक्यता अल्प ! – जलस्रोत खात्याचे माजी प्रमुख अभियंता नाडकर्णी

कर्नाटक म्हादईचे गोव्यात येणारे सर्व पाणी वळवण्याच्या सिद्धतेत ! म्हादईच्या संरक्षणासाठी गोव्यात राजकीय पाठबळ नाही, तर याउलट कर्नाटकमध्ये म्हादईचे पाणी वळवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. गोव्यात असे का होत नाही ?

गोवा : दोन शालेय विद्यार्थिनींनी ‘इन्स्टाग्राम’ पोस्टच्या माध्यमातून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या

‘स्क्वींट नियोन’ या ट्विटर अकाऊंटने ‘गोवा येथील ‘डी.ए.व्ही.’ पब्लीक स्कूलमध्ये शिकणार्‍या २ मुसलमान बहिणींनी हिंदु आणि हिंदु धर्म यांचे विडंबन केले आहे’, अशी माहिती गोवा पोलिसांना ट्वीट करून दिली. या प्रकरणी लक्ष घालण्याचे आवाहन ही केले.

मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी पैशांची मागणी करत असल्‍याचा आरोप !

जनतेच्‍या आरोग्‍याशी संबंधित या गंभीर प्रकाराचे सरकारने सखोल अन्‍वेषण करावे !

नवी मुंबईत पावसाळापूर्व गटार स्‍वच्‍छतेचे काम ६५ टक्‍के पूर्ण !

नवी मुंबई महापालिकेच्‍या क्षेत्रातील पावसाळापूर्व गटारातील गाळ काढणे हे काम ६५ टक्‍के झाले असल्‍याची माहिती घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त बाबासाहेब राजळे यांनी दिली.

विज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीची मर्यादा अन् सर्वाेच्च स्तराचे ज्ञान देणारे अध्यात्म !

वैद्यकीय क्षेत्र – आयुर्वेद एक उपवेद आहे. आयुर्वेदात व्यक्तीच्या वात, पित्त, कफ प्रधान प्रकृतीनुसार औषध देण्यात येते. याउलट ॲलोपॅथीत हे ज्ञात नसल्याने सर्वांना एकच औषध देण्यात येते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सातारा जिल्‍ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्‍यू !

जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. गत २४ घंट्यांत एका रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यामुळे धोका वाढला असून आरोग्‍य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी कोरोनाविषयी काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

राज्‍यातील अन्‍य भाषिक, तसेच केंद्रीय शाळांमध्‍ये होणार मराठीचे मूल्‍यांकन !

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून पुढील ३ वर्षे वरील शाळांतील ८ वी, ९ वी आणि १० वी च्‍या इयत्तांमधील विद्यार्थ्‍यांचे मूल्‍यांकन केले जाणार आहे. यामुळे या शाळांतील विद्यार्थ्‍यांना मराठी भाषा कितपत आकलन होत आहे, याचा अभ्‍यास करता येणार आहे.

तंजावर (तमिळनाडू) येथे ‘श्री विवेकानंद पेरावई’चे अध्‍यक्ष श्री. परमानंदम् यांच्‍या हस्‍ते तमिळ भाषेतील ‘भारतीय अर्थव्‍यवस्‍थेवरील नवे आक्रमण : हलाल जिहाद ?’ ग्रंथाचे प्रकाशन

या सोहळ्‍याचे आयोजन ‘हिंदु इळैंगर येळूच्‍ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ)’चे राज्‍यप्रमुख श्री. पाला संतोष यांनी केले होते. हिंदु जनजागृती समितीचे राष्‍ट्रीय प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे हेही या कार्यक्रमाला उपस्‍थित होते.

श्रीरामनवमीच्‍या शोभायात्रांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर तात्‍काळ कठोर कारवाई करा !

यावर्षी श्रीरामनवमीनिमित्त काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रांवर अनेक ठिकाणी धर्मांधांनी आक्रमणे केली.