श्रीरामनवमीच्‍या शोभायात्रांवर आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर तात्‍काळ कठोर कारवाई करा !

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’मध्‍ये हिंदुत्‍वनिष्‍ठांची मागणी

आंदोलनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – यावर्षी श्रीरामनवमीनिमित्त काढण्‍यात आलेल्‍या शोभायात्रांवर अनेक ठिकाणी धर्मांधांनी आक्रमणे केली. हिंदूंचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या प्रभु श्रीरामाच्‍या धार्मिक उत्‍सवावर मुंबई, गुजरात, कर्नाटक, बंगाल, मध्‍यप्रदेश, झारखंड, देहली आदी ठिकाणी धर्मांधांनी केलेली आक्रमणे ही अत्‍यंत भीषण आहेत. ही आक्रमणे एक सुनियोजित षड्‍यंत्र आहे. त्‍यामुळे सरकारने या षड्‍यंत्रामागील हात शोधून काढण्‍यासाठी विशेष अन्‍वेषण पथक स्‍थापन करावे आणि दोषी आढळलेल्‍या धर्मांधांवर तात्‍काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी येथील शास्‍त्री घाट, वरुणा पूल येथे पार पडलेल्‍या ‘हिंदु राष्‍ट्र-जागृती आंदोलना’त करण्‍यात आली. या आंदोलनामध्‍ये अनेक हिंदुत्‍वनिष्‍ठ, धर्मप्रेमी, राष्‍ट्रप्रेमी, सनातन संस्‍थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्‍थित होते.

उपस्‍थित हिंदुत्‍वनिष्‍ठ

हिंदु युवा वाहिनीचे प्रदेश उपाध्‍यक्ष श्री. मनीष पांडे आणि श्री. आनंद गोस्‍वामी, पहाडिया व्‍यापार मंडळाचे महामंत्री श्री. अरविंद लाल, रा.स्‍व. संघाचे श्री. चंद्रशेखर सिंह, श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. विश्‍वनाथ सिंह, ‘कसाबा ऑर्गेनिक, सारनाथ’चे श्री. अरविंद विश्‍वकर्मा अन् श्री. राज नारायण विश्‍वकर्मा, अखिल भारतीय सनातन समितीचे डॉ. अजय जायसवाल, सर्वश्री मुन्‍नू जायसवाल आणि छेदी जायसवाल, प्रतिष्‍ठित व्‍यापारी श्री. सुमित सराफ, सनातन संस्‍थेच्‍या सौ. प्राची जुवेकर अन् हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केसरी.

आंदोलनात करण्‍यात आलेल्‍या अन्‍य मागण्‍या

१. दंगलीमध्‍ये सार्वजनिक संपत्तीची जी हानी झाली, त्‍याच्‍या तोडफोडीची हानीभरपाई दोषींकडून वसूल करण्‍यात यावी.

२. भारताने पाकिस्‍तानमध्‍ये हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या घटना संयुक्‍त राष्‍ट्रामध्‍ये मांडून त्‍याच्‍यावर जागतिक स्‍तरावर प्रतिबंध घालण्‍यासाठी प्रयत्न करावेत. तसेच पाकमधील हिंदूंच्‍या रक्षणासाठी भारत सरकारने गंभीर पाऊले उचलावीत. याचसमवेत पाकशी संबंधित व्‍यवसाय, दळणवळण आदी गोष्‍टींवर प्रतिबंध घालावा.