नवी मुंबईत पावसाळापूर्व गटार स्‍वच्‍छतेचे काम ६५ टक्‍के पूर्ण !

गटारातील गाळ काढणे काम ( संग्रहीत छायाचित्र )

नवी मुंबई, १९ एप्रिल (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेच्‍या क्षेत्रातील पावसाळापूर्व गटारातील गाळ काढणे हे काम ६५ टक्‍के झाले असल्‍याची माहिती घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाचे उपायुक्‍त बाबासाहेब राजळे यांनी दिली. ज्‍या गटारांमध्‍ये सुका गाळ (माती) निघणार आहे, तो २४ घंट्यामध्‍ये आणि ज्‍या गटारांमध्‍ये ओला गाळ निघणार आहे, तो सुकताच त्‍वरित उचलण्‍याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत, या कामात हलगर्जीपणा करणार्‍यांवर कडक कारवाई करण्‍यात येईल, असे बाबासाहेब राजळे यांनी सांगितले.

यावर्षी ज्‍या ठिकाणी गटारांच्‍या स्‍वच्‍छतेचे काम पूर्ण झाले आहे, त्‍या ठिकाणच्‍या गटारांवरील झाकणांवर
पिवळ्‍या रंगाने मार्क करण्‍यात येणार आहे, असे राजळे यांनी सांगितले.