सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अध्यात्मशास्त्रात १४ विद्या आणि ६४ कला, म्हणजेच जगातील सर्व विषय असतात.
वैद्यकीय क्षेत्र – ‘ॲलोपॅथी‘ आणि ‘आयुर्वेद’ यांच्यातील भेद : विज्ञान केवळ बुद्धीने कळणारे वरवरचे कारण आणि उपाय सांगते. याउलट अध्यात्मशास्त्र व्यक्तीला आजार होण्यासाठी कारणीभूत असलेले काळ (ज्योतिषशास्त्र), प्रारब्ध, वाईट शक्तींचा त्रास इत्यादी अनेक सूत्रे लक्षात घेऊन कारणे सांगते आणि त्यावरील उपायही सांगते. आयुर्वेद एक उपवेद आहे. आयुर्वेदात व्यक्तीच्या वात, पित्त, कफ प्रधान प्रकृतीनुसार औषध देण्यात येते. याउलट ॲलोपॅथीत हे ज्ञात नसल्याने सर्वांना एकच औषध देण्यात येते.
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले