मुख्यमंत्री गेहलोत भ्रष्टाचारी भाजपवाल्यांना पाठीशी घालत आहेत ! – काँग्रेसला घरचा आहेर

काँग्रेस सरकार भ्रष्टाचार्‍यांच्या नेहमीच पाठीशी असते, हे बोफोर्स, २-जी, कोळसा, राष्ट्रकुल, आदर्श अशा अनेक घोटाळ्यांत दिसून आले आहे. त्याविषयी सचिन पायलट आणि अन्य काँग्रेसी कधी तोंड उघडत नाहीत !

राहुल गांधी यांचे विदेशातील नको त्या उद्योगपतींशी संबंध ! – काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांचा दावा

आझाद पुढे म्हणाले की, ‘भारत जोडो’ यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढला, असे अनेक जण म्हणतात; मात्र मला असे वाटत नाही; कारण राहुल गांधी जेव्हा सुरत न्यायालयात गेले, तेव्हा त्यांच्यासमवेत एकही तरुण किंवा शेतकरी नव्हता.

(म्हणे) ‘मी जिवंत असेपर्यंत बस्तर जिल्ह्यात दारूबंदी होणार नाही !’ – छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारचे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा

असे मंत्री असतील, तर कधीतरी दारूबंदी किंवा लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न होतील का ?

हस्तिनापूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणाच्या हत्येनंतर गावकर्‍यांकडून धर्मांध आरोपींच्या घरांची तोडफोड !

धर्मांधांकडून हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे थांबत नसल्याने आणि पोलीसही  ही आक्रमणे रोखण्यात आणि धर्मांधांवर वचक बसवण्यात अपयशी ठरत असल्याने हिंदूंचा उद्रेक होत असेल, तर याला कोण उत्तरदायी ?

कन्याकुमारी (तमिळनाडू) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून तोडफोड !

संतप्त नागरिकांकडून निदर्शने

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे ! – अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ पहा)

सिंधुदुर्ग : कोकणातील पहिल्या शासनमान्य ‘इन्क्युबेशन सेंटर’चे कणकवली येथे उद्घाटन

नवीन व्यवसायासाठी लागणार्‍या सर्व सुविधा या केंद्रामध्ये असणार आहेत. याचा लाभ जिल्ह्यातील नवीन उद्योजकांनी घ्यावा. जिल्ह्यात लवकरच ५०० एकर भूमीत आधुनिक तंत्रज्ञान असलेले उद्योग आणणार !, अशी माहिती केंद्रीय मंत्री राणे यांनी या वेळी दिली.

गोवा : आसगाव येथे बनावट विक्री कराराद्वारे १२ मालमत्तांची विक्री केल्याचे उघड

या १२ मालमत्ता आसगाव आणि पर्रा या गावांतील आहेत. बनावट सिद्ध केलेल्या करारामध्ये वारसाहक्क असलेले मिंगेल आर्कांजिओ डिसोझा एप्रिल १९५१ मध्ये मरण पावले. त्यानंतर ७ महिन्यांनी ते हयात असल्याचे दाखवण्यात आले !

वैज्ञानिक आणि ऋषि यांच्यातील भेद !

‘कुठे यंत्रांद्वारे संशोधन करून पालटते निष्कर्ष सांगणारे वैज्ञानिक, तर कुठे लाखो वर्षांपूर्वी यंत्राखेरीज आणि संशोधनाखेरीज अंतिम सत्य सांगणारे ऋषि ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पहिले पेशवे बाळाजी भट यांचे श्रीवर्धन (रायगड) येथील जन्मस्थान दुर्लक्षित !

हिंदवी स्वराज्याच्या विस्तार करणारे पराक्रमी अन् धुरंधर पहिले पेशवे म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट. हिंदवी स्वराज्यासाठी मैदान गाजवणारे बाळाजी भट हे मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील आहेत. त्यांचे जन्मस्थान येथे आहे.