शेत आणि टॅक्टर जाळले !
मेरठ (उत्तरप्रदेश) – मेरठजवळ असणार्या हस्तिनापूरमध्ये ९ एप्रिल या दिवशी विशू नावाच्या हिंदु तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जमावाने १० एप्रिल या दिवशी येथे धर्मांध मुसलमान आरोपींच्या घरांवर दगडफेक केली, तसेच त्यांच्या शेतांना आणि ट्रॅक्टरला आग लावली. याविषयी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले, तसेच शेताला लावण्यात आलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला.
Investigation underway by cops after 25-year-old man shot dead by two bike-borne persons Uttar Pradesh. #Crime #UttarPradesh https://t.co/p9PC4vm0lt
— Republic (@republic) April 10, 2023
१. विशू येथील शाळेच्या कट्ट्यावर बसले असतांना दुचाकीवरून आलेल्या युवकांपैकी एकाने विशू यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडल्या आणि ते पळून गेले. विशू याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुसर्या दिवशी त्याचा मृतदेह गावात आणल्यावर संतप्त गावकर्यांनी आरोपींच्या घरांवर आक्रमण केले.
२. गावकर्यांनी सांगितले की, या गावात सातत्याने वाद होतात. होळीच्या वेळीही येथे वाद होऊन हिंसाचार झाला होता. त्यात काही जण घायाळ झाले होते. त्यापूर्वीही हिंसाचार झाला होता. (धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर आक्रमण होत असतील, तर पोलीस आणि प्रशासन यांनी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, हेच यातून लक्षात येते ! हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी आता हिंदूंनी संघटित होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करणेच आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाधर्मांधांकडून हिंदूंच्या होत असलेल्या हत्या, तसेच त्यांच्यावरील आक्रमणे थांबत नसल्याने आणि पोलीसही ही आक्रमणे रोखण्यात आणि धर्मांधांवर वचक बसवण्यात अपयशी ठरत असल्याने हिंदूंचा उद्रेक होत असेल, तर याला कोण उत्तरदायी ?, याचा विचार करणे आवश्यक आहे ! |