|
जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील काँग्रेसच्या सरकारवर काँग्रेसचेच नेते सचिन पायलट यांनी टीका केली आहे. सरकार भ्रष्टाचार्यांवर कारवाई करत नाही, असा आरोप करत त्यांनी ११ एप्रिल या दिवशी एक दिवसांचे उपोषण करण्याची घोषणा केली.
Gehlot vs Pilot: गहलोत-पायलट जंग से फिर मुश्किल में आलाकमान, जानें CM पद के घमासान से लेकर अब तक क्या-क्या हुआ#AshokGehlot#SachinPilot#RajasthanPoliticshttps://t.co/t6ibbJf9Aw
— Amar Ujala (@AmarUjalaNews) April 10, 2023
सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर आरोप केला की, त्यांनी भाजपसमवेत तडजोड केली असून ते भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून वाचवत आहेत. भाजपने केलेले घोटाळे गेहलोत सरकार दडपत आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेस सरकार भ्रष्टाचार्यांच्या नेहमीच पाठीशी असते, हे बोफोर्स, २-जी, कोळसा, राष्ट्रकुल, आदर्श अशा अनेक घोटाळ्यांत दिसून आले आहे. त्याविषयी सचिन पायलट आणि अन्य काँग्रेसी कधी तोंड उघडत नाहीत ! |