मुंबईत ३ आतंकवादी शिरल्याचा मुंबई पोलिसांना दूरभाष !

दुबईवरून ७ एप्रिलला पहाटे ३ आतंकवादी मुंबईत शिरल्याची आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहिती संपर्क करणार्‍याने दिली आहे.

मनसेच्या चेतावणीनंतर भुसावळ नगरपालिकेने तापी नदीतील अनधिकृत मजार हटवली !

अनधिकृत मजार निर्माण होईपर्यंत प्रशासन झोपले होते का ? अशांवर आणि ही अनधिकृत मजार निर्माण करणार्‍यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

मुली अत्यंत घाणेरडे कपडे घालून बाहेर पडत असल्याने त्या शूर्पणखा वाटतात ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय

माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. रस्त्यात घट्ट कपडे घातलेली एक तरुणी मद्यधुंद स्थितीत तमाशा करत होती. तिला शूर्पणखा नाही, तर काय म्हणावे ?

आसाममध्ये ‘पी.एफ्.आय.’ या  प्रतिबंधित संघटनेच्या ३ सदस्यांना अटक !

पी.एफ्.आय.वर केवळ बंदी घालणे पुरेसे नसून त्याची पाळेमुळे खणून काढण्यासाठी सुरक्षायंत्रणांना कसोशीने प्रयत्न करावे लागतील, हेच यातून दिसून येते !

सापळा रचून पकडलेल्या लाचखोर सरकारी अधिकार्‍यांना दोषी ठरवण्यात ‘एसीबी’ला अपयश !

लाच घेतलेले अधिकारी आणि कर्मचारी यांना लाच घेतांना रंगेहात पकडलेले असते, तसेच त्यांच्याकडून लाचेची रक्कमही जप्त केली जाते. हे सर्व प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले असतांनाही दोषींना शिक्षा का होत नाही ? नक्की यामध्ये काळेबेरे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या ३ आदिवासी महिलांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दंडवत प्रदक्षिणा घालायला भाग पाडले !

तृणमूल काँग्रेस किती खालच्या पातळीचे राजकारण करत आहे, हे यातून दिसून येते. असा पक्ष लोकशाहीसाठी धोकादायक आहे !

राज्यातील १ सहस्र अवैध मजारींवर कारवाई करणार ! – उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी

जर एका राज्यात इतक्या अवैध मजारी असतील, तर संपूर्ण देशात किती असतील, याची कल्पना करता येत नाही  ! अशा सर्व अवैध मजारींवर कारवाई कधी होणार ?

मध्यप्रदेशात पोलीस ठाण्यावर आक्रमण करून जमावाने ३ आरोपींना सोडवून नेले !

स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?

पाकमध्ये हिंदूंच्या विवाह संदर्भातील कायद्याला संमती

यामुळे आता हिंदूंना त्याच्या परंपरेनुसार विवाह करता येणार आहे. तसेच पाकच्या पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये हा कायदा अधिसूचित करण्यात येणार आहे.

तेलंगाणा सरकारच्या अडथळ्यांमुळे जनता त्रस्त ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तेलंगणा राज्य सरकार आम्हाला साथ देत नसल्याने अनेक विकास कामांना विलंब होत आहे. हे लोक कुटुंबवाद, घराणेशाही आणि भ्रष्टाचार जोपासत राहिले. त्यामुळे जे प्रामाणिकपणे काम करतात, त्यांना अडचणी येत आहेत. राज्य सरकारच्या अडथळ्यांमुळे तेलंगणा त्रस्त आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.