मुंबईत ३ आतंकवादी शिरल्याचा मुंबई पोलिसांना दूरभाष !

तीन आतंकवादी शिरले असल्याची माहिती देणारा दूरभाष मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ

मुंबई – मुंबईमध्ये तीन आतंकवादी शिरले असल्याची माहिती देणारा दूरभाष मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. दुबईवरून ७ एप्रिलला पहाटे ३ आतंकवादी मुंबईत शिरल्याची आणि त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याची माहिती संपर्क करणार्‍याने दिली आहे.

या ३ व्यक्तींचा काळा धंदा आहे. एकाचे नाव मुजीब सय्यद असून त्याचा भ्रमणभाष आणि गाडीचा क्रमांकसुद्धा पोलिसांना संबंधित व्यक्तीने दिला आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.