मध्यप्रदेशात पोलीस ठाण्यावर आक्रमण करून जमावाने ३ आरोपींना सोडवून नेले !

आक्रमणात ३ पोलीस घायाळ

बुर्‍हाणपूर (मध्यप्रदेश) – येथील नेपानगर पोलीस ठाण्यावर ६ एप्रिलच्या रात्री जमावाने आक्रमण करून तेथील कोठडीत बंद करण्यात आलेल्या ३ आरोपींना सोडवून नेले. या वेळी पोलीस ठाण्यात केवळ ४ पोलीस होते. जमाव पोलीस ठाण्यात घुसला आणि त्याने काठ्यांद्वारे पोलिसांवर आक्रमण केले. यात ३ पोलीस घायाळ झाले.

संपादकीय भूमिका 

स्वतःचे रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ?