पाकमध्ये हिंदूंच्या विवाह संदर्भातील कायद्याला संमती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘इस्लामाबाद राजधानी क्षेत्र हिंदू विवाह नियम, २०१७’ला इस्लामाबादमधील प्रशासनाने अधिसूचित केले आहे. यामुळे आता हिंदूंना त्याच्या परंपरेनुसार विवाह करता येणार आहे. तसेच पाकच्या पंजाब, खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान प्रांतांमध्ये हा कायदा अधिसूचित करण्यात येणार आहे.

या कायद्यामुळे आणि हिंदु धर्माचे ज्ञान असणार्‍याला ‘पंडित’ किंवा ‘महाराज’ अशी पदवी दिली जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांकडून चरित्र प्रमाणपत्र आणि १० सदस्यांची अनुमती घ्यावी लागणार आहे. अशा महाराजांना संघ परिषदेकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यानंतर ते जोडप्यांचे विवाह करवून देऊ शकणार आहेत. या परिषदेकडून विवाह प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. यापूर्वी अशा प्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र प्रशासनाकडून दिले जात नव्हते.