‘बीबीसी न्यूज पंजाबी’च्या ट्विटर खात्यावर भारतात बंदी !

हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी बीबीसीवर आता भारतात कायमस्वरूपी बंदी घालणेच आवश्यक आहे !

कुख्यात गुंड आणि समाजवादी पक्षाचा खासदार अतिक अहमद याला जन्मठेप !

१७ वर्षे जुन्या उमेश पाल अपहरण प्रकरणात मिळाली शिक्षा !

कर्नाटकातील भाजपचे आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांना लाचखोरीच्या प्रकरणी अटक

अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना जरब बसेल !

शामली (उत्तरप्रदेश) येथे कुख्यात गुंड जबरूद्दीन याला अटक केल्यामुळे पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण !

अशा कायदाद्रोह्यांवर उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे ! ज्या प्रमाणे गुंड आणि त्यांना साहाय्य करणारे यांची अवैध घरे पाडली जात आहेत, तसेच या लोकांवरही कारवाई व्हावी, असेच जनतेला वाटते !

‘प्रॉव्हिडंड फंड’वरील व्याजदरात वाढ !

केंद्रशासनाच्या ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या बैठकीत  कर्मचार्‍यांच्या प्रॉव्हिडंड फंड (पी.एफ्.) रकमेवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे वृत्त ‘फायनान्शिअल एक्सप्रेस’ने दिले आहे. देशभरात सध्या जवळपास ५ कोटी पी.एफ्. खातेधारक असून त्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

‘राहुल गांधी प्रकरणात आम्ही भारत सरकारच्या संपर्कात !’ – अमेरिका

राहुल गांधी यांची खासदारकी रहित करणे, हे भारताचे अंतर्गत प्रकरण आहे. त्याविषयी अमेरिकेने संपर्कात रहाण्याची काहीही आवश्यकता नाही.

अमेरिकेतील ‘टाइम्स स्क्वेअर’ येथे खालिस्तान समर्थकांकडून मोर्चा !

अशा भारतद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी भारताने अमेरिकेस भाग पाडले पाहिजे !

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी राहुल गांधी यांना क्षमा मागण्यास भाग पाडले पाहिजे ! – रणजीत सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान

राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात चैत्र यात्रेच्या काळात नारळाची विक्री करण्यास आणि वाढवण्यास मनाई !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !
असे निर्णय अन्य धर्मियांच्या उत्सवांच्या वेळी घेण्याचे धाडस प्रशासन दाखवणार का ?

देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड

देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या ९ मतांनी पराभव केला.