देहू संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड

छायाचित्रात डावीकडे पराभूत उमेदवार उमेश मोरे तर उजवीकडे विजयी उमेदवार पुरुषोत्तम मोरे

पुणे – देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुरुषोत्तम मोरेंनी उमेश मोरेंचा अवघ्या ९ मतांनी पराभव केला. मावळते अध्यक्ष नितीन महाराज मोरेंचा कार्यकाळ संपल्याने नवे अध्यक्ष निवडण्यासाठी २६ मार्चला मतदान प्रक्रिया पार पडली. संत तुकाराम महाराज संस्थानच्या गणेशबुवा, गोविंदबुवा आणि आबाजी बुवा अशा ३ शाखा आहेत. दर २ वर्षांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक होते. या वर्षी गणेश बुवा शाखेतील २ उमेदवार होते.

वारकरी संप्रदायाचे कार्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, भाविकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सांगितले.