कर्नाटकातील भाजपचे आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांना लाचखोरीच्या प्रकरणी अटक

डावीकडे भाजपचे आमदार माडाळ विरुपाक्षप्पा

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील भाजपचे आमदार माडाळ विरुपाक्षप्पा यांना ४० लाख रुपयांच्या लाचेच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मागील मासामध्ये त्यांचा मुलगा प्रशांत याला एका कंत्राटदाराकडून लाच घेतांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी माडाळ विरुपाक्षप्पा यांच्यावरही मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यांनी या प्रकरणी अंतरिक जामिनासाठी याचिका प्रविष्ट केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर माडाळ विरुपाक्षप्पा यांना अटक करण्यात आली.

संपादकीय भूमिका 

अशांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कठोर शिक्षा झाली, तरच इतरांना जरब बसेल !