‘बीबीसी न्यूज पंजाबी’च्या ट्विटर खात्यावर भारतात बंदी !

नवी देहली – केंद्रशासनाने ‘बीबीसी न्यूज पंजाबी’ या ट्विटर खात्यावर भारतात बंदी घातली आहे. या खात्यावर गेल्यावर तेथे ‘हे खाते भारतात बंद करण्यात आले आहे’, असा संदेश लिहिण्यात आला आहे. खलिस्तानी अमृतपाल याच्या समर्थनार्थ प्रसार केल्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. बीबीसीवर यापूर्वीही अशा प्रकारची कारवाई झालेली आहे. यापूर्वी केंद्रशासनाने बीबीसीच्या ‘इंडिया : द मोदी क्वेश्‍चन’ या माहितीपटावर भारतात प्रसारण करण्यावर बंदी घातली होती. हा माहितीपट वर्ष २००२ मध्येल गुजरात दंगलीवर आधारित होता.

१९ मार्च २०२३ या दिवशी खलिस्तान समर्थक खासदार, तसेच शिरोमणि अकाली दल(अमृतसर)चे अध्यक्ष सिमरनजीत सिंह मान यांचे ट्विटर खाते बंदी करण्यात आले होते. त्याच्या दुसर्‍या दिवशी कॅनडातील खासदार जगमीत सिंह यांच्या खात्यावर भारतात बंदी घालण्यात आली होती. त्यांनी खलिस्तानी अमृतपाल प्रकरणी पंजाब पोलिसांच्या कारवाईला अयोग्य ठरवले होते.

संपादकीय भूमिका 

हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी बीबीसीवर आता भारतात कायमस्वरूपी बंदी घालणेच आवश्यक आहे !