कुख्यात गुंड आणि समाजवादी पक्षाचा खासदार अतिक अहमद याला जन्मठेप !

१७ वर्षे जुन्या उमेश पाल अपहरण प्रकरणात मिळाली शिक्षा !

कुख्यात गुंड आणि समाजवादी पक्षाचा खासदार अतिक अहमद

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – वर्ष २००६ च्या उमेश पाल अपहरण प्रकरणात कुख्यात गुंड आणि माजी खासदार अतिक अहमद अन् त्याचे शौकत हनीफ आणि शौकत पासी हे २ साथीदार यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात अतिक याचा भाऊ अश्रफ याच्यासह अन्य ७ जण यांना मात्र न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. अतिक याला या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अतिक अहमद याला एक दिवस आधी गुजरातच्या साबरमती कारागृहातून प्रयागराज येथे आणण्यात आले होते. त्याला सुनावणीच्या वेळी न्यायालयात आणण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणी १७ वर्षानंतर दोषींना शिक्षा होणे, हा न्याय म्हणता येईल का ?