मंदिरे धर्मकार्यासाठी कशी कार्यान्वित होतील, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी

आपण देव, देश आणि धर्म यांसाठी केलेल्या कार्यानेच सद्गुरु संतुष्ट होतात. आपल्या मुलांना शिक्षण देण्याबरोबर देव, देश आणि धर्म यांचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. आपली पुढची पिढी राष्ट्रभिमानी निर्माण होण्याची आवश्यकता आहे.

बिबट्याच्या आक्रमणात राजापूर (जि. रत्नागिरी) येथील नायब तहसीलदार दीपाली पंडीत घायाळ

बिबट्या आक्रमण करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. बिबट्याने त्यांच्या हातावर पंजा मारला असून दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

अ‍ॅल्युमिनिअम प्रकल्पबाधित शेतकर्‍यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

शेतकर्‍यांची फसवणूक ! वर्ष १९७५ मध्ये अ‍ॅल्युमिनिअम (BALCO) प्रकल्पासाठी नजीकच्या शिरगाव येथील सुमारे ८३० शेतकर्‍यांची १२०० एकर भूमी संपादित करण्यात आली; मात्र त्यावर प्रकल्प न करता या जागा खासगी आस्थापनांना देण्यात आल्या.

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चा’साठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार ! – किशोर घाटगे

मुंबईत होणार्‍या ‘गड-दुर्ग रक्षण महामोर्चासाठी कोल्‍हापूर जिल्‍ह्यातूनही विविध गड-दुर्गप्रेमी संघटना जाणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे उपजिल्‍हाप्रमुख श्री. किशोर घाटगे यांनी दिली.

उच्‍चभ्रू वस्‍तीमध्‍ये घरफोडी करणार्‍या चोरट्याला पंजाबमधून घेतले कह्यात !

महागड्या चारचाकी गाडीतून येऊन बाणेर रस्‍त्‍यावरील सिंध सोसायटीमध्‍ये घरफोडी करणार्‍या चोरट्याला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने पंजाबमधील जालंधर येथून कह्यात घेतले.

गलिच्छ राजकारणावर ‘हिंदु राष्ट्र’ हाच पर्याय !

‘हल्लीचे बहुतेक ठिकाणचे राजकारण म्हणजे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी ! हे सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) स्थापन करण्यास पर्याय नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कुत्र्याने बाळाला रुग्‍णालयातून नेऊन फाडून खाल्ले !

राज्‍यातील सिरोही येथे एका भटक्‍या कुत्र्याने तेथील रुग्‍णालयात असलेल्‍या एका मासाच्‍या बाळाला फाडून खाल्‍ल्‍याची भयावह घटना नुकतीच घडली. मूल त्‍याच्‍या आईसह रुग्‍णालयात निजले होते. तेव्‍हा कुत्र्याने त्‍याला तोंडात धरून नेले.

कुत्र्यांचे चावे कि ‘प्रशासकीय’ लचके ?

भटक्‍या कुत्र्यांची समस्‍या सोडवू न शकणारी शासकीय यंत्रणा जनहितकारी कारभार काय करणार ?

धर्मांधांची सार्वत्रिक गुन्‍हेगारी वृत्ती जाणा !

ऑस्‍ट्रेलिया पोलिसांनी सिडनी रेल्‍वे स्‍थानकावर एका कर्मचार्‍यावर चाकूद्वारे आक्रमण करणार्‍या महंमद रहमतुल्ला सय्‍यद अहमद या भारतीय नागरिकाला गोळ्‍या झाडून ठार केले. महंमद याने पोलिसांनाही धमकावले होते.