
राजापूर – येथील नायब तहसीलदार दीपाली पंडीत या २८ फेब्रुवारीला रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास शहरातील भटाळी येथे बिबट्याने केलेल्या आक्रमणात घायाळ झाल्या आहेत. पंडीत या राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरून निघाल्या होत्या. त्या राजापूर पोलीस लाइनपासून काही मीटर अंतरावर आल्या असता तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर आक्रमण केले.
कोकणात नायब तहसीलदार महिलेवर बिबट्याचा हल्ला, स्कूटरचाही पाठलागhttps://t.co/mXFVurwiGI #Ratnagiri #Rajapur #LeopardAttack
— Maharashtra Times (@mataonline) March 1, 2023
बिबट्या आक्रमण करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला; मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. बिबट्याने त्यांच्या हातावर पंजा मारला असून दुचाकीवरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या वेळी याच रस्त्याने येणार्या काही पोलिसांच्या ही घटना निदर्शनास आल्यावर त्यांनी दीपाली पंडीत यांना राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी भरती केले आहे.
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १५ जुलैला रत्नागिरी येथे विशेष कार्यक्रम
सामूहिक शेतीतून आघारी येथे चारसूत्री भात लागवडीचा यशस्वी प्रारंभ
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले