उच्‍चभ्रू वस्‍तीमध्‍ये घरफोडी करणार्‍या चोरट्याला पंजाबमधून घेतले कह्यात !

पुणे – महागड्या चारचाकी गाडीतून येऊन बाणेर रस्‍त्‍यावरील सिंध सोसायटीमध्‍ये घरफोडी करणार्‍या चोरट्याला गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने पंजाबमधील जालंधर येथून कह्यात घेतले. त्‍याच्‍या ३ साथीदारांनाही अटक केली असून त्‍यांच्‍याकडून १ कोटी २१ लाख रुपयांचा ऐवज शासनाधीन केला आहे. महंमद इरफान, शमीम शेख, अब्रार शेख आणि राजू म्‍हात्रे अशी आरोपींची नावे आहेत. चोरट्यांनी परदेशी बनावटीची बंदूक, जिवंत काडतुसे, किमती घड्याळे, ४ तोळे सोन्‍याची साखळी आणि २ लाख रुपये असा माल चोरून नेला होता. बंदूक चोरीला गेल्‍याने त्‍यांच्‍याकडून गंभीर गुन्‍हा घडण्‍याची शक्‍यता असल्‍याने पोलीस आयुक्‍त रितेश कुमार आणि पोलीस यांसह आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अन्‍वेषणाच्‍या सूचना दिल्‍या. त्‍या अन्‍वये ३ पथके सिद्ध करून चोरट्यांवर पाळत ठेवून त्‍यांना कह्यात घेतले.