अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक ! – प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी

पूर्वीच्या काळी विविध कामांसाठी देववन, ग्रामवन, राजावन आणि वैद्यवन अशा वनांची निर्मिती होत होती. आताच्या काळातही आयुर्वेदिक वनस्पतींच्या निर्माणासाठी अधिकाधिक वैद्यवनांची निर्मिती होणे आवश्यक आहे.

‘टी.ई.टी.’ अपव्यवहार प्रकरणातील सुपे यांचे ६५ लाखांचे दागिने परत करण्याचे आदेश !

शिक्षक पात्रता परीक्षा (टी.ई.टी.) अपव्यवहार प्रकरणातील आरोपी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून जप्त करण्यात आलेले ६५ लाख १३ सहस्र ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सुपे कुटुंबियांना परत करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस्.जे. डोलारे यांनी दिले आहेत.

समाजवादी पक्षाने माफियांचे पोषण केले; मात्र आम्ही माफियांना नष्ट करू ! – योगी आदित्यनाथ

राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.

भाग्यनगर विश्‍वविद्यालयात एस्.एफ्.आय. आणि अभाविप यांच्या विद्यार्थ्यांमध्ये धूमश्‍चक्री !

तेलंगाणामध्ये हिंदुद्वेषी तेलंगाणा राष्ट्र समितीचे सरकार असल्यामुळे या घटनेत एस्.एफ्.आय.चे विद्यार्थी दोषी आढळले, तरी त्यांच्यावर कदापि कारवाई होणार नाही, हे तितकेच खरे !

(म्हणे) ‘पी.एफ्.आय. प्रमाणेच बजरंग दल आणि विहिंप यांच्यावरही बंदी घाला !’ – मौलाना तौकीर रझा खान

‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्‍या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य !

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षड्यंत्र आहे का ? याची चौकशी व्हावी ! – हिंदु जनजागृती समिती

या दुर्घटनेच्या निमित्ताने प.पू. काडसिद्धेश्वर स्वामी आणि कणेरी मठ यांची अपकीर्ती केली जात आहे. त्यामुळे कणेरी मठातील गायींच्या मृत्यूची सखोल चौकशी करून त्यामागील षड्यंत्र उघड करायला हवे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संपूर्ण हिंदु समाज कणेरी मठाच्या पाठीमागे उभा आहे.

छत्तीसगडमध्ये पुन्हा झालेल्या माओवादी आक्रमणात ३ पोलीस ठार !

माओवाद्यांचा मुळासह नायनाट होण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

स्वतःच्या इच्छेने विवाह करणे ही गोष्ट आधुनिक नाही, तर रामायण आणि महाभारतापासूनची आहे !

‘स्वयंवर’ म्हणजे ‘स्वतःच्या इच्छेने विवाह करणे’ ही काही आधुनिक गोष्ट नाही. याची मुळे प्राचीन इतिहासामध्ये शोधता येऊ शकतात. यात रामायण, महाभारत यांसाख्या पवित्र ग्रंथांचा समावेश आहे.

उत्तरप्रदेशातील राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार आणि पोलीस कर्मचारी यांची हत्या

प्रयागराज येथे वर्ष २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस कर्मचारी यांच्या हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड आतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, आतिकची पत्नी शाईस्ता आणि त्यांची २ मुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ भारताच्या दौर्‍यावर !

जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ २ दिवसांच्या भारत दौर्‍यावर राजधानी देहलीमध्ये पोचले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तसेच राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही चान्सलर स्कोल्झ भेट घेणार आहेत.