(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

चंडीगड (हरियाणा) – राज्यातील भिवानी येथे २ गोतस्करांचे शव मिळण्याच्या घटनेवरून ‘इत्तेहाद-ए-मिल्लत काउंसिल’ या इस्लामी संघटनेचे प्रमुख मौलाना तौकीर रझा खान यांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आतंकवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली आहे. ‘ज्याप्रकारे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर प्रतिबंध घालण्यात आला, त्या प्रकारेच बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद या संघटनांवरही बंदी लादण्यात यावी’, असेही तौकीर रझा म्हणाले.
Maulana Tauqeer Raza Khan gives a provocative warcry. Khan demanded that right-wing org. such as VHP & Bajrang Dal be declared terrorist organizations and be banned just like the PFI.
Agar Lathi ka raaz rahega desh mai to Alhamdulillah lathi humari bhi kamzoor nai hai: Khan pic.twitter.com/L53jP51NFq
— TIMES NOW (@TimesNow) February 25, 2023
१. रझा म्हणाले की, भिवानीमध्ये १६ फेब्रुवारी या दिवशी गोतस्करांची हत्या करण्यात आली. आम्ही तेव्हा गप्प होतो; परंतु जेव्हा बैठका आणि महापंचायतीत आरोपींची बाजू घेण्यात आली, त्या वेळी असे वाटले की, आता समूहहत्या सामान्य झाले आहे.
२. याआधीही तौकीर रझा यांनी अनेक हिंदुविरोधी वक्तव्ये केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी ‘कलमा’ वाचून इस्लाम समजून घेण्याचा फुकटचा सल्लाही याच रझा यांनी दिला होता. या माध्यमातून त्या दोघांनी इस्लाम स्वीकारण्याविषयी त्यांनी म्हटले होते. ‘कलमा’ हे इस्लाममधील असे द्वार आहे, जे वाचून कुणीही मुसलमानेतर इस्लाम स्वीकारू शकतो.
संपादकीय भूमिका‘क्रूरकर्मा औरंगजेब हा जगातील सर्वाेत्कृष्ट राजा होता’, अशा प्रकारे गरळओक करणार्या मौलाना तौकीर रझा खान यांनी अशी मागणी करणे यात काय आश्चर्य ! |
बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान अधिकार्याच्या धार्मिक जाचामुळे हिंदु पोलीस निरीक्षकाची आत्महत्या !
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !