छत्तीसगडमध्ये पुन्हा झालेल्या माओवादी आक्रमणात ३ पोलीस ठार !

रायपूर (छत्तीसगड) – तीन दिवसांपूर्वी माओवाद्यांनी केलेल्या आक्रमणात २ पोलीस ठार झाले असतांना आता पुन्हा छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यात असलेल्या कुंदेडजवळ माओवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ३ पोलीस ठार झाले आहेत.

पोलीस कारवाईसाठी निघाले असतांना दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी पोलिसांच्या तुकडीवर आक्रमण केले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार चालू केला. त्यानंतर पोलिसांनीही माओवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले; परंतु यामध्ये ३ पोलीस ठार झाले.

संपादकीय भूमिका 

माओवाद्यांचा मुळासह नायनाट होण्यासाठी केंद्र सरकारने युद्ध स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !