‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ने शेतकर्‍यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री श्री रविशंकर म्हणाले की, तीक्ष्ण बुद्धी आणि कोमल भाव ही भारतीय संस्कृतीची देणगी आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान आवश्यक असल्याचे जगातील सर्व देशांनी मान्य केले आहे. आयुर्वेद, योग, ध्यान, आध्यात्मिक ज्ञान ही भारताची श्रेष्ठ संपत्ती आहे.

दोडामार्ग येथे ‘लोकवर्गणीतून रुग्णवाहिका’

प्रशासनानेच नागरिकांसाठी रुग्णवाहिकेसारख्या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असतांना त्यासाठी लोकवर्गणी गोळा करावी लागणे, स्थानिक प्रशासनाला लज्जास्पद !

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटककडून दादागिरी चालू आहे. यावरून गोमंतकीय पेटून उठलेले असतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटक येथे जाऊन ‘विद्यमान भाजप सरकारच सत्तेवर आले पाहिजे’, असे सांगत आहेत.

गोवा मुक्तीलढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली निवर्तले !

नागेश करमली यांचा कोकणी भाषा मंडळाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा होता. गझल हा प्रकार त्यांनी कोकणीत रूजवला. त्यांनी मराठी वर्तमानपत्रातही स्तंभलेखन केले आहे.

स्वतंत्र ‘आंबा बोर्डा’साठी २०० कोटी रुपयांचे आर्थिक प्रावधान ! – उद्योगमंत्री उदय सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार नुकतेच महत्त्वाच्या ४ बैठका झाल्या. त्यात आंबा बागायतदारांसाठी ‘स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना’ करण्याचा पहिला ठोस निर्णय घेण्यात आला.

पत्रकाराच्या हत्येप्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही ! – पालकमंत्री उदय सामंत

पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाईचे निर्देश देण्यात आले असून जो कुणी आहे, तो रिफायनरी समर्थक असूदे किंवा रिफायनरी समर्थक नसूदे, योग्य तो न्याय दिला जाईल.

गाढवाला गुळाची चव काय ?

‘हिंदु धर्माच्या विरोधात साहित्यिक, बुद्धीप्रामाण्यवादी इत्यादी बडबडतात. तेव्हा ‘गाढवाला गुळाची चव काय ?’, या म्हणीची आठवण येते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते मुंबईत ‘वंदे भारत’ रेल्‍वेचे लोकार्पण !

‘वंदे भारत’ च्‍या लोकार्पणानंतर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि कुरार भुयारी मार्ग यांचेही पंतप्रधानांच्‍या हस्‍ते लोकार्पण होईल. दुपारी ४.३० वाजता पंतप्रधान ‘अल्‍जामिया-तुस-सैफियाह’ या परिससरातील विकासकामांचे उद़्‍घाटन करणार आहेत.

पनवेल येथे १२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा !

लँड जिहाद यांसारखे हिंदूंवरील विविध आघात रोखण्‍यासह हिंदूंना पुन्‍हा एकदा सन्‍मानाने जगण्‍यासाठी ‘हिंदु राष्‍ट्र’ स्‍थापण्‍याची आवश्‍यकता असून या हिंदु राष्‍ट्र-जागृती सभांच्‍या माध्‍यमातून हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने देशभर जनजागृती केली जात आहे.’’

सर्व समस्‍यांवर एकमेव उपाय : हिंदु राष्‍ट्र ! – सुनील घनवट,  राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

दोंडाईचा (धुळे) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा अविष्‍कार ! या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.