मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर १७ मिनिटांत ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

मुंबई – मुंबई ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर १७ मिनिटांत गाठता येणार आहे. त्‍यासाठी वॉटर टॅक्‍सी सेवा चालू करण्‍याचा निर्णय केंद्रीय रस्‍ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केला. ठाणे येथे १८ नोव्‍हेंबर या दिवशी झालेल्‍या एका प्रचारसभेत गडकरी बोलत होते. नवी मुंबई विमानतळ मार्च २०२५ पासून चालू  होण्‍याची शक्‍यता आहे.

ते पुढे म्‍हणाले की,

१. भारतात प्रथम वॉटर टॅक्‍सी सेवा वर्ष २०२० मध्‍ये केरळमध्‍ये चालू झाली. नवी मुंबई विमानतळाजवळ ‘जेटी’ची निर्मिती यापूर्वीच झाली आहे. मुंबई आणि ठाणे परिसराला विशाल समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्राचा जल वाहतुकीसाठी वापर करून रस्‍त्‍यावरील गर्दी आणि प्रदूषण न्‍यून करता येणार आहे.

२. मुंबई-देहली एक्‍सप्रेस पूर्ण झाल्‍यावर मुंबई-पुणे महामार्गावरील गर्दी न्‍यून होईल.