|
दोडामार्ग – रुग्णवाहिकेच्या अभावी रुग्णांची होणारी परवड लक्षात घेऊन नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी येथील जनतेला आवाहन करून ‘लोकवर्गणीतून रुग्णवाहिका’ ही संकल्पना मांडली. याला दोडामार्गवासियांनी उत्स्फूर्त साथ देत एकाच वेळी ७ लाख रुपये जमवले, तर उर्वरित ८ लाख रुपयांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ढासळलेल्या आरोग्यसेवेच्या विरोधात तालुक्यात सर्वांत मोठे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले होते; तरीही येथील आरोग्याचा प्रश्न अद्याप तसाच आहे. (हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक) कोरोना महामारीच्या काळात आरोग्यसेवांची उणीव अधिक प्रमाणात जाणवली होती. लोकप्रतिनिधी, तसेच शासन यांचे या समस्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे रुग्णवाहिकेसाठी जनतेलाच आवाहन करण्याची वेळ आली. यातून बोध घेऊन शासन, प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधी येथील आरोग्यसेवेविषयीचे प्रश्न सोडवण्यासाठी आतातरी प्रयत्न करतील का ?, असा प्रश्न समाजातून विचारला जात आहे.
संपादकीय भूमिका
|