रशियाच्या शस्त्रसाठ्यामध्ये ७५ टक्के घट झाल्याने आक्रमणाची धार बोथट ! – अमेरिकेचा दावा

अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने आतापर्यंत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता; मात्र आता शस्त्रसाठ्यामध्ये घट होऊ लागल्याने तो जुनी शस्त्रे वापरत आहे.

गोवा : आयोगाचे आयुक्त निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव आज गोव्यात येणार

राज्यात बनावट कागदपत्रे सिद्ध करून भूमी बळकावून तिची विक्री केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्यानंतर गोवा सरकारने ऑगस्ट २०२२ मध्ये या प्रकरणी आयोग नेमून आयुक्तपदी निवृत्त न्यायाधीश व्ही.के. जाधव यांची नेमणूक केली होती.

हत्या आणि आत्महत्या करण्यापेक्षा समुपदेशन घ्या ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

कौटुंबिक कलह, हत्या, आत्महत्या आदी मनाशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी समाजाला आध्यात्मिक साधना शिकवणे आवश्यक !

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून कळसा आणि भंडुरा प्रकल्पांची पहाणी

कर्नाटक सरकारने कळसा आणि भंडुरा प्रकल्प उभारून म्हादईचे पाणी मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्राकडे अनेक दाखल्यांची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील अधिकार्‍यांनी ही भेट दिली आहे.

गोवा : काणकोण रेल्वेस्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या थांब्यासाठी जागरूक काणकोणकरांची आंदोलनाची चेतावणी

१३ जानेवारीपासून विविध स्वरूपाची आंदोलने चालू करण्याचा सामूहिक निर्धार करण्यात आला आहे. परिस्थितीने मागणी केल्यास ‘काणकोण बंद’ची हाक देण्यास मागेपुढे पहाणार नाही.

म्हादई प्रकरणी शासनाचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार

केंद्रीय जलआयोगाने कळसा आणि भंडुरा अहवाला’ला (डी.पी.आर्.) दिलेली मान्यता रहित करावी आणि यासाठी गोवा सरकारने केंद्रावर दबाव आणावा, अशी जनभावना आहे. या पार्श्‍वभूमीवर ही गृहमंत्र्यांसमवेत होणारी बैठक महत्त्वाची आहे.

गोवा : पिळर्ण औद्योगिक वसाहतीत रंग तयार करणार्‍या कारखान्याला भीषण आग

या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज ! आग लागल्याने कारखान्यातील सर्व कामगार त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी टळली; मात्र एक कामगार या दुर्घटनेत घायाळ झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिली.

शासकीय इमारतीचे साहित्य चोरणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करावा ! – आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस

या प्रकरणी अनेक तक्रारी केल्या, सर्वसामान्य नागरिक उपोषणाला बसले; मात्र चोरी होऊनही तक्रार घेतली जात नाही किंवा कोणताही विभाग त्याचे उत्तरदायित्व स्वीकारत नाही, हे दुर्देवाचे आहे.

अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे भव्य हिंदु धर्मरक्षण मूक मोर्चाला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !

हिंदूंनो, आपल्या माता-भगिनींची अवस्था श्रद्धा वालकरप्रमाणे होऊ द्यायची नसेल, तर त्यांना धर्मशिक्षण द्या. गोमातेचे रक्षण, धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ यांसारखे हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी आपण संघटित होऊन प्रयत्न करूया.

हिंदूंची श्रद्धास्थाने आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान आता सहन करणार नाही ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

गडहिंग्लज येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेला ७ सहस्र हिंदूंची उपस्थिती !