पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाईफेकेची धमकी !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक प्रसारमाध्यमाच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा नोंद !

पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे पवनाथाडी यात्रेसाठी येणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा शाईफेकेची धमकी दिली आहे. ‘पत्रकार मित्रांनो, आज पण चांगला अँगल घ्या, चंपाचे तोंड काळे करा रे’, अशी धमकीवजा चेतावणी त्यांना दिली आहे. यासंदर्भात भाजपचे माजी नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक प्रसारमाध्यमाचे अध्यक्ष विकास लोले आणि दशरथ पाटील यांच्यावर द्वेष भावना पसरवणे, धमकी देणे, तसेच फेसबुकवर पोस्ट करून आणि व्हॉट्सअपचे स्टेट्स ठेवून समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी १५२ आणि ५०५ कलमांतर्गत गुन्हा नोंद केला आहे.