|
जोधपूर (राजस्थान) – काँग्रेसशासित राजस्थानमधील जोधपूरमधील सरदारपुरा भागात असलेल्या महेश पब्लिक स्कूल’च्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना फेरफटका मारण्याच्या नावाखाली चर्चमध्ये नेल्याची घटना समोर आली. या वेळी मुलांना ख्रिस्ती प्रार्थनाही करायला लावल्याचा आरोप आहे. याविषयीचे वृत्त समजताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी अप्रसन्नता व्यक्त केली. समाजातून विरोध होत असल्याचे लक्षात येताच शाळेच्या व्यवस्थापनाने क्षमायाचना केली आहे.
विश्व हिंदु परिषद आणि इतर हिंदु संघटना यांनी या शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाईची मागणी केली आहे. यासह विश्व हिंदु परिषदेचे नेते महेंद्र सिंह यांनी पालकांच्या अनुमतीविना विद्यार्थ्यांना चर्चमध्ये प्रार्थना करायला लावणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे. याविषयी शाळेच्या व्यवस्थापनाने विनाअट क्षमायाचना करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या वतीने क्षमायाचना पत्र प्रसिद्ध केल्याचे वृत्त आहे.
संपादकीय भूमिका
|