दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

दमोह (मध्यप्रदेश) – येथील प्राचीन शिव हनुमान मंदिरात शिवलिंगाची तोडफोड केल्याच्या प्रकरणी शमशेर उपाख्य मोनू खान याला अटक करण्यात आली आहे. १८ डिसेंबरला ही घटना घडली. या घटनेमुळे येथे तणाव निर्माण झाला होता. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शमशेर याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदाच्या (रासुकाच्या) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शमशेर याने यापूर्वीही या भागात धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट रचला होता. (तेव्हाच त्याच्यावर कठोर कारवाई झाली असती, तर ही घटना घडली नसती ! मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना अशा घटना होऊ नयेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक)

काही दिवसांपूर्वी इंदूर येथे शिवमंदिरात अश्‍लील कृती केल्यावरून पोलिसांनी वसीम याला राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत अटक केली होती.

संपादकीय भूमिका

अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?