विवाह करण्यासाठी पळून जाणार्‍या १७ वर्षांच्या मुसलमान मुलगा आणि १५ वर्षांची हिंदु मुलगी यांना अटक

हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्याने ते मुसलमान तरुणांच्या जाळ्यात फसतात आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते. हिंदु तरुणींना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक !

हिंदुद्वेषी वीर दास याच्या मुंबईतील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांचा विरोध !

वेळोवेळी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणारा हिंदुद्वेषी हास्यकलाकार वीर दास याच्या मुंबईमधील कार्यक्रमाला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीताच्या नावाखाली दिली अजान : हिंदुत्वनिष्ठांची निदर्शने

हिजाब प्रकरणानंतर आता अजान प्रकरणावरून कर्नाटकमधील शाळांमध्ये किती पराकोटीची धर्मांधता जोपासली जात आहे, हे स्पष्ट होते !

श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठ संघटनांची पुण्यात आक्रोश सभा

यासह वासनांध नराधमांना कठोर शिक्षा होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी सरकारवर वैध मार्गांनी दबाव आणला पाहिजे !

धार्मिक कार्यासाठी सन्मार्गाने मिळवलेले धनच वापरावे !

‘एखाद्या धार्मिक संस्थेला कुणीतरी दिलेले पैसे पापाने मिळवलेले असल्यास ते व्यर्थ जातात, म्हणजे एखाद्या सेवेसाठी ते पैसे वापरले, तर त्या सेवेची फलनिष्पत्ती चांगली नसते. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

नागपूर येथील गुंड अक्कू यादव याच्या हत्येमागे नक्षलवादी प्रेरणा !

नक्षलवाद्यांच्या श्रद्धांजली पत्रकातून खुलासा !

आळंदी यात्रेच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ३०० बसगाड्यांचे नियोजन !

कार्तिकी एकादशी आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र आळंदी येथे येणार्‍या भाविकांची संख्या अधिक असते. त्यामुळे वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पी.एम्.पी.कडून (पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून) ३०० बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

वारणा-कोडोली (कोल्हापूर) येथे ‘संजीवन सभे’च्या नावाखाली चालू असलेला कार्यक्रम बंद करावा !

‘संजीवन सभा शांती महोत्सव’ या कार्यक्रमामुळे ग्रामीण, गरीब, अशिक्षित हिंदु कुटुंबांमध्ये भक्तीच्या नावाखाली धर्मांतराचे षड्यंत्र चालवले जाते. त्यामुळे संयोजकांवर गुन्हे नोंद करून कार्यक्रम त्वरित बंद करावा, या मागणीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आले.