विवाह करण्यासाठी पळून जाणार्‍या १७ वर्षांच्या मुसलमान मुलगा आणि १५ वर्षांची हिंदु मुलगी यांना अटक

मुलगी अडीच मासांची गर्भवती

(प्रतिकात्मक चित्र)

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथे १७ वर्षांच्या मुसलमान मुलासमवेत १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी विवाह करण्यासाठी घरातून पळून सागर येथे जात असतांना त्यांना पोलिसांनी विदिशा येथून अटक केली. ही मुलगी अडीच मासांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.

मुसलमान मुलाला भोपाळ किशोर न्याय बोर्ड, तर मुलीला बाल कल्याण समिती भोपाळ यांच्याकडे ठेवण्यात आले आहे. मुसलमान मुलगा रिक्शा चालवतो. त्याला चोरीच्या प्रकरणात अटकही करण्यात आली होती. तो व्यसनी असल्याचेही समोर आले आहे. हिंदु मुलीने सांगितले, ‘मुलाच्या आईने मला सांगितले होते की, तू माझ्या मुलाशी लग्न केलेस तर तो सुधारेल. तो चोरी आणि व्यसन करणे सोडून देईल. मी त्याचे धर्मांतरही करून देईन.’

संपादकीय भूमिका

हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्याने ते मुसलमान तरुणांच्या जाळ्यात फसतात आणि त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी होते. हिंदु तरुणींना धर्मशिक्षण मिळण्यासाठी हिंदूंच्या संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक !