विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीताच्या नावाखाली दिली अजान : हिंदुत्वनिष्ठांची निदर्शने

  • उडुपी (कर्नाटक) येथील क्रीडा स्पर्धांच्या वेळी संतापजनक प्रकार

  • शाळेच्या व्यवस्थापनाकडून क्षमायाचना

(अजान म्हणजे नमाजासाठी देण्यात येणारे आमंत्रण)

(प्रतिकात्मक चित्र)

उडुपी (कर्नाटक) – येथील ‘मदर टेरेसा मेमोरीयल’ शाळेच्या क्रीडा स्पर्धांच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणण्याच्या नावाखाली ध्वनीक्षेपकावरून अजान दिल्याने येथे तणाव निर्माण झाला. ही माहिती मिळताच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शाळेसमोर निदर्शने करत घोषणाबाजी केली. ‘अजान देण्याची अनुमती देणारे शाळेचे व्यवस्थान आणि अन्य पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली. यावर शाळेच्या व्यवस्थापनाने क्षमायाचना करून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

वरील कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीत म्हणून हिंदु, मुसलमान आणि ख्रिस्ती या तिन्ही धर्मांचे गीत म्हणण्यास सांगण्यात आले होते. या वेळी वरील प्रकार घडला.

संपादकीय भूमिका

  • हिजाब प्रकरणानंतर आता अजान प्रकरणावरून कर्नाटकमधील शाळांमध्ये किती पराकोटीची धर्मांधता जोपासली जात आहे, हे स्पष्ट होते !
  • शाळेत श्रीमद्गवद्गीता शिकवण्यावरून शाळेचे भगवेकरण होत असल्याची ओरड करणारे आता ‘ शाळेचे इस्लामीकरण होत आहे’, असे म्हणणार का ?
  • कर्नाटकमध्ये भाजपचे शासन असतांना असे प्रकार घडू नयेत, असे हिंदूंना वाटते !