कुर्ला (मुंबई) येथे शमीम खान याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार !

मुंबई येथील कुर्ला येथे शमीम शान याने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडील राजेश लोंढे यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

क्रमांकाची पाटी नसलेल्या नव्या शासकीय चारचाकी वाहनाचा विधानभवन परिसरात प्रवेश !

१५ नोव्हेंबर या दिवशी विधानभवन सभागृहात हिवाळी अधिवेशनाच्या सिद्धतेचा आढावा घेऊन सुरक्षेचा प्रश्न प्राधान्याने चर्चिला गेला. सुरक्षेच्या दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या विधानभवन परिसरात त्याच वेळी क्रमांकाची पाटी नसलेले चारचाकी शासकीय वाहन आले.

प्रतापगडावर भावी पिढीला प्रेरणा देणारा शिवरायांचा इतिहास उभारणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

वर्ष २०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा इतिहास भावी पिढीला माहिती व्हावा, यासाठी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची माहिती देणारे देखावे उभारण्यात येतील. यासाठी ‘लेझर शो’चेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथील कुंभ महोत्सव !

नागपूर येथे मुलांचे अपहरण करणार्‍या टोळीतील सूत्रधारासह तिघांना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

शहरात लहान मुलांचे अपहरण करणार्‍या टोळीचे सूत्रधार योगेंद्र आणि त्याची पत्नी रिटा प्रजापती, तसेच या टोळीची महिला सूत्रधार श्वेता सावले उपाख्य श्वेता खान मकबूल खान (वय ४३ वर्षे) यांना न्यायालयाने १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

संभाजीनगर येथे धर्मांध रिक्शाचालक अश्लील बोलू लागल्यावर हिंदु तरुणीची धावत्या रिक्शातून उडी !

हिंदूंनो, धर्मांधांकडून आपल्या लेकीबाळींना त्रास देण्याचे वाढते प्रकार पहाता त्यांना वेळीच धर्मशिक्षण देऊन धर्मनिष्ठ बनवा ! तरुणींनो, वासनांध वृत्तीच्या धर्मांधांना धडा शिकवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्या !

सातार्‍यात नवीन कारागृह बांधण्याचा प्रस्ताव सादर करावा ! – शंभूराज देसाई, उत्पादन शुल्कमंत्री

तट भिंतीची उंची वाढवणे, कारागृहातील सर्व ‘बॅरेक’, स्वयंपाकगृह आणि कार्यालय यांवरील पत्रे पालटणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे, अंतर्गत नाले दुरुस्ती करणे, स्वयंपाकगृहाचे नूतनीकरण करणे यांसह इतर कामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

‘मागणी तसा पुरवठा’ यावर आधारित शेतीत निश्चित यश मिळते ! – प्रकाश आवाडे, आमदार

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शेतकरी आघाडी, ‘नेचर केअर फर्टिलायझर विटा’ (जिल्हा सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मण शेतकरी मेळाव्याचे विश्वपंढरी सभागृह, कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आले होते.

सर्वधर्मसमभावाची ऐशीतैशी !

इमाम आणि पाद्री यांना असे वेतन देणे, हा शासनपुरस्कृत दरोडाच आहे, असेच म्हणावे लागेल. यावरून आपल्या देशातील सर्वधर्मसमभाव किती ढोंगी आहे, हे अधोरेखित होते. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता हिंदूंनी कंबर कसून वैध मार्गांनी लढा देण्याला पर्याय उरलेला नाही !

समान नागरी कायदा हवाच !

मुसलमानांचा विरोध केवळ त्यांच्या सोयीसुविधा बंद होतील, यासाठीच आहे. वास्तविक या निधर्मी देशात धर्माच्या आधारे सोयीसुविधा उपभोगणे, हा धर्मनिरपेक्षतेचा अवमान असून गेली ७५ वर्षे तो केला जात आहे. आता तो थांबवणेच देशहिताचे आहे.