रेल्वेने श्री हनुमान मंदिराला नोटीस बजावून १० दिवसांत मंदिर हटवण्यास सांगितले !

रेल्वेचा अजब कारभार ! रेल्वेच्या भूमीवरील अन्य धर्मियांची धार्मिक स्थळे हटवण्यासाठी अशा नोटिसा देण्याचे धाडस रेल्वे कधी करते का ?

दहा रुपयांची फसवणूक केल्यामुळे ग्राहकाला १५ सहस्र रुपये देण्याचा जिल्हा ग्राहक मंच (सिंधुदुर्ग)चा वीज वितरणला आदेश

वीज वितरण आस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात यशस्वी लढा देणारे ओरोस येथील विष्णुप्रसाद दळवी यांचे अभिनंदन ! ग्राहकांना विविध कारणांनी वेठीस धरणार्‍या वीज वितरण आस्थापनाला हा मोठा धक्का आहे !

गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी सातार्डा येथे एकाला अटक

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायाने महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांनी नुकतीच दिली होती. असे असूनही . . .

आदर्श हिंदु राष्ट्र, म्हणजेच रामराज्य !

‘हिंदु राष्ट्रात, म्हणजेच रामराज्यात लहानपणापासूनच साधना करवून घेण्यात येत असल्यामुळे व्यक्तीतील रज-तम गुणांचे प्रमाण अल्प होऊन व्यक्ती सात्त्विक बनते. त्यामुळे ‘गुन्हा करावा’, असा विचारही तिच्या मनात येत नाही ! साधनेमुळे सर्व प्रजा सात्त्विक असल्यामुळे कुणी गुन्हा करत नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांच्यासह लघुपट दिग्दर्शक श्री. गिरिश केमकर यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे कार्य जाणून घेण्यासाठी आलेले पुणे येथील सुप्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे, श्री. गिरिश केमकर, त्यांच्या सहकारी सौ. अमृता कामत आणि त्यांचे ५ विद्यार्थी यांनी १० ऑक्टोबरला आले होते.

हिंदूंची संपत्ती हडपण्याचा अमर्याद अधिकार असलेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशभरात या कायद्याचा अपवापर होत असलेला हा ‘लँड जिहाद’ (भूमी जिहाद) आहे. हा कायदा धार्मिक भेदभाव करणारा, राज्यघटनाविरोधी असून तो तात्काळ रहित करण्यात यावा.

आशिया आणि अमेरिका खंड भविष्यात एकत्र येऊन होणार अमेशिया महाद्वीप !

पुढील २० ते ३० कोटी वर्षांमध्ये आर्क्टिक महासागर आणि कॅरिबियन सागर हे विलुप्त होऊन आशिया अन् अमेरिका खंड एकत्र येतील. यामुळे ‘अमेशिया’ नावाचे महाद्वीप उदयास येईल, असा अंदाज ऑस्ट्रेलियातील ‘कर्टिन विश्वविद्यालय’ आणि चीनचे ‘पेकिंग विश्वविद्यालय’ येथील संशोधनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

देहू संस्थानचे जुगारी विश्वस्त विशाल मोरे याची हकालपट्टी !

येथील देहू संस्थानचे जुगारी विश्वस्त विशाल मोरे यांना तीन पत्त्यांचा जुगार खेळतांना पकडले होते. त्यामुळे संस्थानने त्यांची अखेर हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागेसाठी आता निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात नाना मोरेंचा एकमेव अर्ज राहिलेला आहे.

सोलापूर-देहली या मार्गावर नवीन रेल्वे धावणार !

ही गाडी हुबळी येथून २०६५७ या क्रमांकाने शुक्रवारी रात्री ११.५० वाजता निघेल आणि हजरत निजामुद्दीन स्थानकावर रविवारी सकाळी १०.४० वाजता पोचेल. तसेच हजरत निजामुद्दीन स्थानकावरून २०६५८ या क्रमांकाने रविवारी दुपारी ३.५५ वाजता सुटेल.

विदेशी ॲपमध्ये पैसे गुंतवल्यामुळे सोलापूरवासियांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक !

तांत्रिक माहिती नसतांना ‘व्हर्चुअल’ गुंतवणूक केल्याने लोकांना फटका बसत आहे, अशी माहिती नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रातील तज्ञ देत आहेत. अपकीर्तीच्या भीतीने अनेक जण समोर येऊन तक्रार द्यायला घाबरत आहेत. त्यामुळे अशा फसवणूक करणार्‍यांचे फावत आहे.