२ मुलांचा पिता असणार्‍या मुसलमानासमवेत ३ मुलांची आई असणार्‍या हिंदु महिलेचे पलायन !

ओपी क्षेत्रात ३ मुलांची आई असणार्‍या किरण सिंह ही हिंदु महिला २ मुलांचा पिता असणार्‍या महंमद शहनवाज आलम याच्यासमवेत पळून गेल्याची घटना समोर आली आहे.

(म्हणे) ‘श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे जे हाल होत आहेत, तसेच पंतप्रधान मोदी यांचेही होतील !’

‘बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे एके दिवशी जनतेचा उद्रेक होऊन त्यांनाच पलायन करावे लागेल’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !

न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी विजय माल्या याला ४ मासांच्या कारावासाची शिक्षा

विदेशात पळून गेलेला उद्योगपती विजय माल्या याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी ४ मासांच्या कारावासाची, तसेच २ सहस्र रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेच्या खासदारांची मागणी

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.

ईदच्या दिवशी दुर्गाडी गडावर आरतीसाठी प्रवेश नाकारल्याने हिंदू आणि शिवसेना यांच्याकडून निषेध !

येथे ईदनिमित्त नमाजपठण होत असतांना आरती आणि घंटानाद करण्यासाठी हिंदूंना प्रवेशबंदी केली जाते. याचा निषेध म्हणून वर्ष १९८६ पासून येथे शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येते.

कुख्यात गुंड आबू सालेम याला २५ वर्षांच्या शिक्षेनंतर सोडावे लागेल ! – सर्वोच्च न्यायालय

मुंबईमध्ये वर्ष १९९३ मध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात कुख्यात गुंड आबू सालेम याला दोषी ठरवण्यात आले आहे. कारागृहाची शिक्षा भोगल्यानंतर पोर्तुगालला दिलेल्या शब्दाचा मान राखण्यासाठी केंद्र सरकारला त्याला मुक्त करावे लागेल’, असे न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले.

आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाकडून स्थगिती

मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्‍वर येथे ५४ फूट उंच व्यासपिठावर उभारण्यात येणार्‍या आदि शंकराचार्य यांच्या १०८ फूट उंच पुतळ्याच्या बांधकामाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

कोल्हापूर येथील ‘बी’ न्यूजच्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असणार्‍या ‘संवाद-प्रतिवाद’ या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचे साधक श्री. अमोल कुलकर्णी, सौ. मेघमाला जोशी यांच्यासह आध्यात्मिक तज्ञ (क्वांटम) नम्रता देशमुख यांचा सहभाग आहे.

गोरक्षण करण्यासाठी बेरोजगारांना गायींचे संगोपन करण्याचे दायित्व देणार !

उत्तराखंडमधील पुष्कर सिंह धामी शासनाचे अभिनंदन ! गोमाता सर्वार्थाने महत्त्वाची असल्याने अन्य भाजपशासित राज्यांनीही गायींचे रक्षण करण्यासाठी शासकीय स्तरावर अशी योजना राबवणे आवश्यक !

‘जैश-ए-महंमद’चा संस्थापक आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहेब’ संबोधले !

कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणे, आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहब’ संबोधणे, अशा प्रकारे काँग्रेसी नेत्यांचा जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचा इतिहासच आहे. अशा राष्ट्रघातकी काँग्रेसवर आता सरकारने बंदीच आणली पाहिजे !