अटक न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागितली होती !
पुणे – फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट ३ चे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, साहाय्यक फौजदार संतोष क्षीरसागर यांना पोलीसदलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याविषयीचे आदेश दिले आहेत. श्रीहरि बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या दंगल नियंत्रण पथकामध्ये नियुक्तीस आहेत.
बहिरट यांच्या सांगण्यावरून गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी साहाय्यक फौजदार क्षीरसागर याने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
संपादकीय भूमिकाअसे भ्रष्ट पोलीस समाजातील भ्रष्टाचार कसा रोखणार ? सक्षम, कर्तव्यदक्ष आणि चारित्र्यवान पोलिसांची भरती केली, तरच भारतीय पोलीसयंत्रणा सक्षम होईल. |