कोल्हापूर येथील ‘बी’ न्यूजच्या ‘संवाद-प्रतिवाद’ या कार्यक्रमात सनातन संस्थेचा सहभाग !

कोल्हापूर, ११ जुलै (वार्ता.) – कोल्हापूर येथील लोकप्रिय ‘बी’ न्यूज या स्थानिक  वृत्तवाहिनीवर प्रत्येक सोमवारी ‘संवाद-प्रतिवाद’ हा कार्यक्रम प्रक्षेपित होतो. वाहिनीचे संपादक श्री. चारुदत्त जोशी विविध क्षेत्रांतील मान्यवर, तज्ञ यांच्याशी या कार्यक्रमात संवाद साधतात. ११ जुलै या दिवशी रात्री १० वाजता गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असणार्‍या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेचे साधक श्री. अमोल कुलकर्णी, सौ. मेघमाला जोशी यांच्यासह आध्यात्मिक तज्ञ (क्वांटम) नम्रता देशमुख यांचा सहभाग आहे.

(सौजन्य : channel B) 

बी न्यूज बातमीपत्र झाल्यावर,

आज रात्री १० वाजता पहा, संवाद – प्रतिवाद.. विषय : भारतीय संस्कृती आणि परंपरा या मागील शास्त्रीय अधिष्ठान, गुरुपौर्णिमा म्हणजे काय.. वाढदिवस कसा साजरा करावा.. नमस्कार का करतात.. देवळात जाण्याने काय होते.. श्रद्धा आणि अंधश्रध्दा यातील फरक आणि अध्यात्म – ध्यानधारणा याबाबतचे विवेचन…

सहभाग : डॉ. नम्रता देशमुख, सनातन संस्थेचे अमोल कुलकर्णी आणि सौ. मेघमाला जोशी.

एका अत्यंत इंटरेस्टिंग विषयावरील दिलखुलास चर्चा.. नक्की पहा.

पुनर्प्रक्षेपण : मंगळवारी सकाळी १० वाजता आणि बुधवारी रात्री ८ वाजता..