‘कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.’ आस्थापनाच्या वतीने व्याख्यान
पुणे, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर नवरात्रीच्या निमित्ताने धर्माचरण करून स्वतःतील आदिशक्ती दुर्गादेवीचे तत्त्व जागृत करून स्वतःसमवेतच राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी केले. कोथरूड येथील कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि. आस्थापनाच्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश विनायक कुलकर्णी यांच्या पुढाकाराने नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कु. क्रांती पेटकर यांनी ‘नवरात्र, विजयादशमी आणि दिवाळी या सणांचे आध्यात्मिक महत्त्व’ यांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चाचवली (ता. मुळशी) येथील कु. राजाऊ मराठे या साडेपाच वर्षांच्या मुलीने वडिलांसमवेत एका दिवसात ११ गड सर केल्याने तिची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. आस्थापनाच्या वतीने या वेळी तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि. आस्थापनाचे कर्मचारी आणि इतर मान्यवर असे मिळून पुष्कळ जिज्ञासू उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा. लि. कंपनीच्या संचालिका सौ. मृणाल राजेश कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश विनायक कुलकर्णी यांची ‘प्रत्येक सणाचे महत्त्व आस्थापनातील सर्व कर्मचार्यांना कळावे आणि ते त्या संदर्भात जागृत व्हावेत’, अशी तळमळ असते. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून ते प्रत्येक सणानिमित्त व्याख्यान आयोजित करतात.
२. मागील महिन्यात देहली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या ‘सेमिकॉन इंडिया २०२४’ या कार्यक्रमात कीट्रॉनिक्स (इंडिया) प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. राजेश कुलकर्णी हे सहभागी झाले होते.