(म्हणे) ‘श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे जे हाल होत आहेत, तसेच पंतप्रधान मोदी यांचेही होतील !’

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रीस अली यांचे विधान

तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रीस अली आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोलकाता (बंगाल) – मला वाटते भारतात पंतप्रधान मोदी यांचे तेच हाल होतील, जे श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे होत आहेत, असे विधान बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार इद्रीस अली यांनी केले.

इद्रीय अली पुढे म्हणाले की, भारतात सध्या जे काही होत आहे, त्याच्या मागे पंतप्रधान मोदी यांचा हात आहे. त्यांचे अपयश आहे. श्रीलंकेमध्ये जे काही घडत आहे, त्यापेक्षा अधिक येथे घडेल आणि पंतप्रधान मोदी यांना त्यागपत्र देऊन देशातून पळून जावे लागेल.

संपादकीय भूमिका

‘बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जे काही करत आहेत, त्यामुळे एके दिवशी जनतेचा उद्रेक होऊन त्यांनाच पलायन करावे लागेल’, असे कुणी म्हटल्यास आश्‍चर्य वाटू नये !