‘जैश-ए-महंमद’चा संस्थापक आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहेब’ संबोधले !

काँग्रेसचे नेते पवन खेडा यांच्याकडून कुख्यात आतंकवाद्याला आदर

काँग्रेसचे नेते पवन खेडा

रायपूर (छत्तीसगड) – येथे पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेले काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी ‘जैश-ए-महंमद’ या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा संस्थापक मसूद अझहर याला ‘साहेब’ म्हणून संबोधले. यावरून त्यांची टीका केली जात आहे. उदयपूर हत्याकांडातील आरोपी हे भाजपशी संबंधित असल्याचे समोर आल्यावर काँग्रेस या प्रकरणावरून देशभरात भाजपच्या विरोधात सध्या पत्रकार परिषदा घेत आहे. या निमित्ताने खेडा रायपूर येथे आले होते. त्यांनी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याने सामाजिक माध्यमांतून त्यांच्या विरोधात जोरदार टीका केली जात आहे.

संपादकीय भूमिका 

कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेनला ‘ओसामाजी’ म्हणणे, ‘वर्ष २००१ च्या संसदेवरील आक्रमणाचा सूत्रधार महंमद अफझल याचे प्रकरण नीट हाताळले नाही’, असा आरोप करणे, वर्ष १९९३ च्या बाँबस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमन याला फाशी होऊ नये, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणे, आतंकवादी मसूद अझहर याला ‘साहब’ संबोधणे, अशा प्रकारे काँग्रेसी नेत्यांचा जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालण्याचा इतिहासच आहे. अशा राष्ट्रघातकी काँग्रेसवर आता सरकारने बंदीच आणली पाहिजे !